HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन अन् स्वाक्षरी मोहीम

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत. मलिक ईडीच्या कोठडीत असताना सुद्धा त्यांचा राज्य सरकारने राजीनामा घेतला नाही. यामुळे भाजप राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेसन काल (३ मार्च) सुरू झाले असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मलिकांनाच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. आज (४ मार्च) देखील मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत पुन्हा एकदा विधीमंडळाच्या पाऱ्यांवर आंदोलन केले असून यावेळी भाजपच्या सर्व आमदारांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. 

दरम्यान, भाजपने हातात घेतलेल्या बॅनर ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहेत का??, असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. तर ‘ ‘दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, आशा घोषाबाजी करत भाजपने नवाब मलिक आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. या आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपेचे नेते गोपीचंद पडळकर, भाजपचे आमदार अतुल भातकळकर, आदी नेते आंदोलनात सहभागी झाले.

मलिकांचा ईडी कोडठी ७ मार्चपर्यंत वाढवली

मलिकांच्या प्रकरणाची काल (३ मार्च) विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी पार पडली. यात मलिकांच्या ईडीच्या कोठीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान मलिकांची तब्यात ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे गेल्या दिवसांपासून चौकशी करणे शक्य झाले नाही. यामुळे मलिकांच्या ईडीच्या चौकशीत वाढ करण्याची मागणी ईडीच्या वकिलानी न्यायालयात केली. न्यायालयात दोन्ही बाजुचा युक्तीवाद संपल्यानंतर मलिकाच्या कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या प्रकरणांमूळे महाराष्ट्र सरकार अस्थिर होऊ लागली तर आधीच केंद्रातील सरकार पडेल – संजय राऊत

News Desk

शिवसेनेने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव पाठवला तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू | बाळासाहेब थोरात

News Desk

बैल मारण्यासाठी आल्यावर त्याची शिंगे पकडली, हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

News Desk