HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस,प्रवचने झाडणे बंद करा आता ! सामनातून टोला…

मुंबई : देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरा करत तिथल्या कोरोना परिस्थितीची माहिती घेत आहेत. सरकारच्या एकंदर कारभाराविरूद्ध ते भूमिका घेत आहेत. याआधी त्यांचा राज्यातील हा दौरा म्हणजेडिझास्टर टुरिझमआहे अशी टिका कॅबिनेट मंत्रीआदित्य ठाकरे यांनी केली होती तरनया है वहंम्हणतं फडणवीसांनी त्याला प्रत्युत्तर दिले.

आता फडणवीसांच्या या दौऱ्यावरून आणि टिकेवरून सामनामधून त्यांचा समाचार घेण्यात आला आहे.फडणवीस दौरे करून कोरोनासंकटाची सध्या माहिती करून घेत आहे. कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. रोज प्रवचन देण्यापेक्षा  त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले काम पाहायला हवे, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.

सामनामध्ये फडणवीसांबरोबरचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनाही टार्गेट करण्यात आले आहे.’कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वांत मोठे संकट आहे, अशी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. कोरोनामुळे उत्पादन ,नोकऱ्या तसेचआरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत!, अशी टीका भाजपनेत्यांवर केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ , भाजपकडून मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलन

News Desk

संभाजी भिडेंना २६ मार्चपर्यंत अटक करण्याचे अल्टिमेटम

News Desk

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनादेश मिळाला आहे !

News Desk