HW News Marathi
महाराष्ट्र

‘राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, तर जनताच….’, सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना इशारा

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आहे. शरद पवार यांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा मी राजकारण सोडेन, असं जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केलं होतं. त्यावर भाजपचने नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटावर केला आहे. तुम्हाला राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही. जनताच तुम्हाला संन्यास घ्यायला लावेल, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल

सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर टीका करत त्यांना टोला लगावला आहे. ” हातात खंजीर घेतला आणि तो खूपसला असा खंजीर खुपसणे याचा शब्दशः अर्थ होत नाही. त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नये. भाजप आपल्या शिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी कपोकल्पित गोष्टी समोर आणल्या. त्यांनी बेईमानीचं बीज रोवलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काँग्रेसबद्दल टोकाची भूमिका होती. तरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी युती तोडली. त्यांना राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही. जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

भाजपला कोरोना झाला म्हणून ते सत्तेतून गेले

भाजपला कोरोना झाला म्हणून ते सत्तेतून गेले, असं राऊत म्हणाले होते. त्यावरही मुनंगटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. या विधानाबद्दल राऊतांनी सपशेल माफी मागितली पाहिजे. राऊतांनी या विधानातून कोरोना झालेल्या लोकांचा अवमान केला आहे. त्यांच्या पक्षातील लोकांना आणि सहयोगी पक्षांना कोरोना झाला म्हणजे त्यांनी पाप केलं का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

दारूच्या दुकानावर एवढं का प्रेम आहे?

महाराष्ट्रात मंदिरं अजूनही बंद आहेत, त्यावर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. आम्ही साथ देऊ. पण ज्या प्रमाणे मंदिर बंद आहे, त्याप्रमाणे दारूची दुकान बंद करा. तुम्हाला दारूच्या दुकानावर एवढं का प्रेम आहे? त्या ठिकाणी गर्दी होत नाही का? त्या ठिकाणी कोरोना पसरत नाही का? मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन बघावं बारमध्ये किती गर्दी आहे. यांना कोरोनाच्या तारखा माहीत आहे का? मंदिरे सुरू करायची नाही तर नका करू. पण कारण तर योग्य द्या. देवाच शिष्टमंडळ भेटायला येऊ शकत नाही म्हणून ते बंद. पण ते शिष्ट मडळ आलं तर महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो

महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याचत शाब्दिक वादावादी सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं ओपन चॅलेंज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा राऊतांना काय उत्तर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आम्ही समोरून वार करतो

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी थेट चंद्रकांत पाटील यांनाच ललकारले. चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं सांगतानाच ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

News Desk

निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासमध्ये उद्धव ठाकरेंची नोंद होईल; निलेश राणेंची जहरी टीका

Aprna