HW News Marathi
महाराष्ट्र

आरेतील वृक्षतोडीविरोधात सुमोटो याचिका, सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

नवी दिल्ली । मुंबईमधील आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडसाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आज (७ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरेतील वृक्षतोडी विरोधात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे लक्ष वेधले आहे. या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीविरोधात सुमोटो याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष खंडपीठ स्थापन केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात याबाबत आज सकाळी १० वाजता सुनावणी होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे. सध्या या परिसरात नाकाबंदी आणि जमावबंदी कायम आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यात येऊ नये, अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (४ ऑक्टोबर) फेटाळल्यानंतर त्या रात्रीच प्रशासनाने वृक्षतोडीचे काम हाती घेतले.

या घटनेनंतर शनिवारी (५ ऑक्टोबर) दिवसभर वृक्षतोड सुरू असतानाच, पोलिसांनी आरे कॉलनी परिसरात नाकाबंदीसह जमावबंदीचे आदेश दिले. शनिवारी रात्रीपर्यंत २,१८५ झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. एमएमआरडीएकडून मेट्रोचे १४ प्रकल्प राबविले जाणार आहेत.शंभर आंदोलकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर २९ आंदोलकांना अटक केली होती. स्थानिकांनी अटक केलेल्या २९ आंदोलकांची सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग

Aprna

खळबळ उडवणाऱ्या मुलाखतीचं काय झालं? हवा आली आणि गेली,निलेश राणेंचा टोला …

News Desk

महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली !

swarit