HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येत वापरलेले पिस्तुल सापडले, सीबीआयला मोठे यश

मुंबई | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येत वापरलेले पिस्तुल सापडल्याचा दावा, सीबीआय करत आहे. त्यामुळे सीबीआयला दाभोळकर हत्येप्रकरणात मोठे यश मानले जात आहे. मारेकऱ्यान हे पिस्तुल ठाण्याजवळच्या खारेगाव खाडीतून हे पिस्तुल नॉर्वेचा जलतरणपटूंनी शोधून काढले आहे. हे पिस्तूल मारेकऱ्यांनी एका खाडीत फेकून दिलेले होते. सीबीआयच्या हाती आलेले हे पिस्तुल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.

दाभोळकरांची हत्या ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गेल्या ७ वर्षापासून तपास सुरू असून देखील अद्याप आरोपी सापडलेले नाही. या प्रकरणी न्यायालयाने अनेकदा सीबीआयच्या तपासावर ताशेरे ओढले होते. मात्र, आबीआयला दाभोळकराच्या हत्येत वापरलेले पिस्तुल मिळाल्यामुळे आता तपासाला गती आल्याचे बोले जाते आहे.

तसेच सीबीआयला सापडलेले पिस्तुल हे खरोखर दाभोळकरांच्या हत्येत वापरले होते का? हे आता फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टवर अवबंलबून असल्याचे आहे. या प्रकरणी सीबीआयने प्रमुख आरोपी म्हणून वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांच्यासह सात जणांना अटक केली होती. दरम्यान, नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्तुलांची विल्हेवाट लावल्याचा दावाही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीच्या कारवाईविरोधात मलिकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

बाळासाहेबांचे ‘हे’स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धार करूया,अजित पवारांची बाळासाहेबांना श्रद्धांजली!

News Desk

फसव्या बाळूमामाला अटक!

News Desk