बारामती | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा काल (१५ जुलै) वाढदिवस झाला. मात्र “यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका. कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करु नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या,” असे आवाहन धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले होते.
Happy Belated Birthday Dhananjay! 🥳 🎂 🍰@dhananjay_munde pic.twitter.com/mxcy89AwrZ
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2020
दरम्यान, आज (१६ जुलै) धनंजय मुंडे यांनी बारामतीला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना केक भरवत आशीर्वाद दिले.त्यानंतर धनंजय मुंडे यांनी वाढदिवसाचे फोटो ट्विट करत शरद पवारांचे आभार मानले आहेत.
कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय @PawarSpeaks साहेबांची भेट घेतली. @supriya_sule ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. @NCPspeaks हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा 'आधारवड' कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई ! असाच आशीर्वाद राहू द्या🙏 pic.twitter.com/a6czzA9W8n
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.