HW News Marathi
देश / विदेश

भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही रसिक शिल्लक असल्याचे ऐकून समाधान वाटलं | सुप्रिया सुळे

मुंबई | “भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही काही रसिक शिल्लक आहेत हे ऐकून मला खूप समाधान वाटलं”, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला आहे. लेखक अंबरीश मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी भाजप नेते आशिष शेलारांना उद्देशून केलेल्या विधानात एकीकडे भाजपवर निशाणा साधत दुसरीकडे सुप्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कौतुक केले आहे.

आशिष शेलारांना उद्देशून भाजपवर निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणतात कि, “मला आज आशिष शेलारांना भेटून आणि त्यांचं भाषण ऐकून खूप आनंद झाला. भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही काही रसिक शिल्लक राहिलेत ते ऐकून माझ्या मनाला खूप समाधान वाटलं. याआधी भाषणांमध्ये साहित्य कलेचा समावेश असायचा. मात्र, आता मी आणि संजय राऊत संसदेत जी भाषणं ऐकतो त्यात एक वेगळीच धार असते. आजकाल या भाषणात साहित्य कलेचा समावेश दिसतच नाही.”

खासदार संजय राऊत यांचे कौतुक करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, “संजय राऊत चांगलं आणि दर्जेदार लिखाण करतात. ते जे काही लिहितात त्याची दररोज हेडलाईन होतेच. त्यांचं जरा राजकीय असतंच पण आता मला त्यांचं तेच लिखाण फार आवडतं आणि पटतंही.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या राजकीय टोलेबाजीला सभागृहातील उपस्थितांनी मनमोकळी दाद देखील दिल्याचे पाहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : आम्ही केंद्रासोबत, ही राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk

नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल

News Desk

मुंबई जगातील चौथे सर्वाधिक प्रदूषित शहर

swarit