HW News Marathi
महाराष्ट्र

“सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारावं”, भाजपची टीका!

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकनाट्यामुळे डिवचल्या गेलेल्या भाजपाने शिवसेनेला त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. शिवसेना खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर भाजपाने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याची भावना सत्ताधारी पक्षांतून उमटत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही आमच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यावरुनच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावे..

नागपुरात बोलताना त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतल्या पक्षांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “महाविकासआघाडी सरकार मधील लोकांना ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावे.. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की सत्तेचा गैरवापर या आधी इतका कधीच झाला नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारा की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला”.

नेमकं प्रकरण काय आहे?

ईडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळे यांनी, “ईडीचा कायम राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच झालाय,” असं हसत उत्तर दिलं होतं आणि त्या निघून गेल्या होत्या. तर अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, “आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असं मी कधीच पाहिलं नाही. कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंनी विकास करण्याची जबाबदारी देत धनंजय मुंडेंना दिल्या शुभेच्छा…  

News Desk

बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Aprna

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी खासदारांना संभाजीराजे छत्रपती यांचे पत्र

News Desk