HW News Marathi
महाराष्ट्र

पुरस्कार सोहळे स्थगित नव्या तारखेची होणार घोषणा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुणे येथील वाघोली येथे दिनांक १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१९ आणि तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

पुलवामा, जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून वाघोली येथे होणारा तमाशा महोत्सव हा स्थगित करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ कलाकार मोमीन कवठेकर यांना दिला जाणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार वितरण सोहळा हा देखील रद्द करण्यात आला असून, वितरण सोहळ्याची पुढील तारीख सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नंतर घोषित करण्यात येणार आहे, असे श्री. तावडे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका महाविकासआघाडी एकत्र लढणार!

News Desk

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला… शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ !

Adil

आधी सुसाईड नोट, आता सीडीआरमध्ये पुरावे, पोलीस कसून तपास करणार, महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं गूढ उकलणार?

News Desk
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा

News Desk

मुंबई | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१६ फेब्रुवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यात मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये मोदी पांढरकवडा येथे महिला बचतगटाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. जिल्ह्यातील महिला बचतगटाचे मोठे जाळे असून १७ हजार पेक्षा जास्त बचत गट महाराष्ट्रात कार्यरतत आहेत. मोदींची हे आज सकाळी १०.३० वाजता महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी ते येणार असून येथे सभा संबांधित करणार आहे.

या बचत गटातील सर्व महिलांच्या कार्याचे मोदी पांढरकवडा येथून कौतुक करणार आहेत. तसेच मोदी यांचाय दुपारी २ वाजता धुळ्यात त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मिळली आहे. तसेच नियोजित सभेत मोदी संबोधित करणार आहेत. यावेळी मोदींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे देखील उपस्थित राहतील.

Related posts

बर्ड फ्ल्यूने एक ही जीवितहानी नाही, पशुसंवर्धन मंत्र्याची माहिती

News Desk

‘त्या’ ८० हजार फेक अकाऊंटचे मालक कोण? फेसबुक आणि ट्वीटरने जाहीर करावे !

News Desk

दिवाळी आधी मदत मिळणार, सरकार शेतकऱ्यांसोबत असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही – बच्चू कडू

News Desk