HW News Marathi
महाराष्ट्र

Tauktae Cyclone : मुंबईपासून150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत रौदरुप धारण केलेल्या तौत्के चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने आता प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासूनच मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाल देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मुंबईसह ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज

तौत्के चक्रीवादळाचा आज रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला समांतर समुद्रातून प्रवास होणार आहे. या वादळाचा वेग तासागणिक वाढत चालला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या

तौक्त चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केलं जात आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांसाठी घरे; विशेष योजना तयार करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Aprna

वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक पदी मोक्षदा पाटील

News Desk