HW News Marathi
महाराष्ट्र

शिक्षकाने केला पत्नीचा खून

अमरावती: चांदूर रेल्वे भागात एका शिक्षकाने शिक्षक पत्नीची हत्या केली. कविता कीर्तीराज इंगोले असे शिक्षिकेचे नाव आहे. या प्रकरणी पती कीर्तीराज नामदेव इंगोले यास अटक करण्यात आली. कविता ही चांदूर रेल्वे येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. कीर्तीराज हा आमला विश्वेश्वर येथे शिक्षक होता. या दोघांना २ मुले आहेत. कविता व कीर्तीराज यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. प्रकरण घटस्फोटापर्यंत आले होते आणि त्यावर न्यायालयात सुनावणीदेखील सुरू होती. गेल्या महिनाभरापासून कविता ही तिच्या वडिलांकडं नांदगाव खंडेश्वर इथे राहत होती. मंगळवारी ती चांदूर रेल्वे येथे शाळेला गेली होती. मात्र, रात्र झाली तरी परतली नाही. मंगळवारी सकाळी कविताचा मृतदेह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील यणस गावाजवळ आढळून आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांना दिलासा; खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

Manasi Devkar

‘प्रताप सरनाईकांविरोधात सध्या कोणतीही कारवाई करु नका’, हायकोर्टाचा आदेश!

News Desk

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील! – मुख्यमंत्री

Aprna