HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे आणि अनिल देशमुखांच्या भेटीची ‘ती’ तारीख संशय निर्माण करणारी!

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप करताना, अनेक दावे केले होते. त्यामुळे राजकारणात तर खळबळ उडालीच पण राष्ट्रवादीच्या गोटातही मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आर्थिक व्यवहारांबाबत बोलण्यासाठी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. मात्र, हे आरोप संशयास्पद असल्याचं आता समोर येत आहे.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना परमबीर सिंह यांनी ‘व्हॉट्सअॅप चॅट’चा मजकूर जाहीर केला होता. तसंच, कोणते पोलीस अधिकारी देशमुख यांना कोणत्या दिवशी भेटले याची माहिती देखील दिली होती. सचिन वाझे, संजय पाटील हे अधिकारी गृहमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख त्यांनी नमूद केली आहे, ती संशय निर्माण करणारी असल्याचं मेडिकल रेकॉर्डवरून समोर आलं आहे.

परमबीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख यांनी वाझेंना मुंबईतील ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यात भेटायला बोलावलं होतं. मात्र, ज्या दिवशी वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याचा दावा परमबीर यांनी केला आहे. त्या दिवशी अनिल देशमुख हे मुंबईत नव्हते. ते नागपूरमध्ये होते आणि तिथं कोरोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाच्या कागदपत्रांतून ते समोर आलं आहे. ‘सीएनएन न्यूज १८’ या इंग्रजी वृत्तवाहिनीनं याच कागदपत्रांच्या आधारे तसा दावा केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमधून एक्झीट घेत आणखी एक नेता राष्ट्रवादीची वाट धरणार?

News Desk

“लोकलने लोकं प्रवास करतात, वरळीत पब सुरु असतो मग परीक्षा पण झाल्याच असत्या”, भाजपचा टोला

News Desk

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता ‘सावित्री उत्सव’ म्हणून ओळखला जाणार

News Desk