HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगोलीत मराठा आंदोलकांनी पेटवली पोलीस गाडी

हिंगोली | हिंगोली येथा मराठा मोर्चेकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारी आक्रमक झालेलया आंदोलकांनी न्याय मिळत नाही म्हणून औरंगाबाद येथे गोदावरी पात्रात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एका आंदोलकाचा यात मृत्यू देखील झाला. सोमवारी एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यापासून मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आक्रमक होत हिंगोली येथे मंगळवारी पोलिसांची गाडी पेटवून दिली आहे.

मुंबई वगळता मराठा मोर्चेकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोर्चेकरी आक्रमक होत असून बस, गाड्याची तोडफोड करताना पाहायला मिळत आहेत. काकासाहेब शिंदे यांच्या दुर्देुवी मृत्यूमुळे मराठा समन्वय समितीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणे हीच दोन मोठी आव्हाने !

News Desk

सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए |

News Desk

आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला

News Desk
मुंबई

लोअर परळचा पूल आजपासून बंद, चाकरमान्यांचे हाल

News Desk

मुंबई | अंधेरी पूर्व दुर्घटनेनंतर आता लोअर परळचा पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून दुरुस्तीपर्यंत हा पूल बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेचा हा पूल लोअर परळ स्थानकाजवळ असून ६४ डिग्रीतून तो रुळांना तिरका क्रॉस करून बांधला आहे. १७ जुलै रोजी या पुलाची आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने प्राथमिक सुरक्षा तपासणी केल्यानंतर हा पूल तातडीने बंद करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी स्ट्रक्चरल इंजिनीअर्स आणि सल्लागाराच्या सुचनेनुसार आजपासून हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पुलाची लांबी ६२.७२ मीटर व रुंदी २३.२० मीटर इतकी आहे.

लोअर परळ स्थानकाबाहेर नागरिकांची गैरसोय

या पुलाच्या दुरुस्तीचं काम आजपासून सुरु झालं आहे. त्यामुळे दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत पूल बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडू सांगण्यात आलं आहे. पण, नागरिकांना याची पूर्वकल्पना नसल्याने या पुलाच्या खाली असलेल्या पर्यायी पुलावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गर्दीमुळे प्रवाशांचा आरडाओरडा सुरु आहे.

लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी एक पूल उपलब्ध आहे, पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, त्यातच रस्त्यावर बाईक पार्क असतात. तिथून बाहेर पडायला प्रवाशांना 20 ते 25 मिनिट लागत आहेत. रेल्वे पूल करण्याआधी प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचं तसंच पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिला नसल्याचं यावरुन दिसत आहे. महापालिका काय करत आहे, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. तसेच प्रवाशांनी आणि नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

पडसलगीकरांना पुन्हा मुदतवाढ नाही, मुंबईच्या नवीन सीपी पदी परमबीर की बर्वे ?

News Desk

चेंबूरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk

मुंबईतील ‘या’ धोकादायक पुलांची दुरुस्ती कधी होणार ?

News Desk