HW News Marathi
महाराष्ट्र

नगर जिल्ह्यात बहरली सफरचंदाची बाग, सुहास वाबळेंचा यशस्वी प्रयोग

कोपरगाव | फळं म्हटली की ठराविक भागात ठराविक ती येणं हे साहजिकच आहे. जसं आंबा म्हटलं की कोकण तसं सफरचंद म्हटलं की काश्मिरच डोळ्यासमोर येतं. मात्र, महाराष्ट्रात सफरचंद पिकवण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. सफरचंदांच फळ घेण्यासाठी त्यासाठी लागणारं पोषक हवामान हे काश्मिरमध्ये आहे.  परंतू, शेती व्यवसायातही संशोधनाची प्रगती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचीच प्रचिती समोर आली आहे.महाराष्ट्रातील कोपरगाव येथील सुरेगावातील सुहास वाबळे या शेतकऱ्याने यशस्वीरित्या सफरचंदाची बाग फुलवून दाखवली आहे.

सफरचंद लागवडीची माहिती कशी मिळाली ?

प्रगतशील शेतकरी सुहास वाबळेंनी यासाठी संशोधन केलय.शेतीविषक परिसंवाद आणि मार्गदर्शनाकरता राजस्थानमधील जोधपूरमधील एका गावात सुमारे ४३-४४ डिग्री सेल्सियस तापमानात सफरचंदाची बाग बहरलेली त्यांना दिसली. यातील प्रत्येक झाडाला ३०० ते ४०० फळं लागली होती. शेतीविषयक आवड असल्याने त्याच्या बाग आणि कलमाविषयी अधिक माहिती त्यांनी घेतली. याविषयी बोलताना सुहास वाबळे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी डाळींब, चिकू, पेरु, द्राक्षे याची बाग लावून उत्पन्न घ्यायला प्रयत्न करतात. या व्यतिरिक्त पीक घेण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र, मला शेतीची आवड असल्याने आपल्या भागात आणि वातावरणात ही बाग येऊ शकते हे लक्षात आलं.

सफरचंदाच्या बागेतून उत्पन्न किती ?

आणखी माहिती मिळवल्यानंतर त्यांना असं समजलं की, सफरचंदाचे हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे संशोधन केंद्र असून यामध्ये २० जातींचे सफरचंदची रोपं आहेत. त्यामधील १७ जाती हायचिलिंग आहेत. चिलिंग म्हणजेच बर्फ पडल्याशिवाय फळं बहरत नाहीत. बाकीच्या ३ जाती या उष्म हवामानातही बहरुन येतात. हरिमन ९९, डोरसेट आणि गाला या जाती आहेत. यापैकी हरिमन ९९ या जातीचं रोप आणून बाग तयार केली. सेंद्रीय खत वापरल्यामुळे पहिलेच उत्पन्न अडीच ते ३ लाखांचं निघेल अशी अपेक्षा वाबळे यांनी व्यक्त केली आहे.

सफरचंदाच झाड लावलं पण ते टिकणार किती ?

सफरचंदाच्या या झाडांचं आयुष्य ३० ते ४० वर्षांचं असून साधारणपणे ८ ते १० वर्षांमध्ये झाडांची उंची १२ ते १५ फुटापर्यंत जाते. आणि पहिल्या २ वर्षांनंतर अडीच ते ३ लाखांचं उत्पन्न मिळू शकतं. जशी झाडांची वाढ होईल तसं उत्पन वाढत जाईल. त्यामुळे सेंद्रीय खत वापरुन शाश्वत उत्पन्न घ्यावे असे आवाहन सुहास वाबळेंनी युवकांना आणि शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी घेतले केदारनाथचे दर्शन

News Desk

रमाई आंबेडकरांच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे राष्ट्रपतींच्याहस्ते अनावरण

News Desk

ठरलं! पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं होणार

News Desk