HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा ‘या’ कारणामुळे रद्द

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांचा औरंगाबाद (Aurangabad) दौरा अचानक रद्द झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे औरंगाबाद येथे आयोजित औद्योगिक प्रदर्शन अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोसाठी आज (5 जानेवारी) जाणार होते. परंतु, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा औरंगाबाद दौरा रद्द केला. विमानातील तांत्रिक बिघाड दुरूस्ती न  झाल्यानंतर दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हे ऑनलाईन हजेरी लावणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये डीएमआयसी ऑरिक हे उद्योगकांच्या प्रदर्शना 5 ते 8 जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. विमानातील तांत्रिक बिघाड झाला होता. विमानातील बिघाड तासभर प्रयत्न करूनही दुरुस्त न झाल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद दौरा रद्द केला आहे.

 

 

Related posts

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १०वी-१२वी परीक्षेदरम्यान वर्गात कमीत कमी विद्यार्थी बसवण्याचा निर्णय

swarit

घरासाठी पीएफची नवी योजना

News Desk

एसटी चालक संतोष मानेची फाशी रद्द, आता सुनावली जन्मठेपेची शिक्षा

News Desk