HW News Marathi
राजकारण

“योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये कशा करता रोड शो करत आहेत?”, संजय राऊतांचा सवाल

मुंबई | “योगी आदित्यनाथ हे मुंबईमध्ये कशा करता रोड शो करत आहेत?”, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या रोड शोवरून केला आहे. योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई रोड शोवरून संजय राऊतांनी आज (5 जानेवारी) माध्यमांशी बोलताना निशाणा साधला.  मुंबई दौऱ्यादरम्यान बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी बुधवारी (4 जानेवारी) योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील आहे.  तसेच या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत.

संजय राऊत म्हणाले, “मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील. तर आश्चर्यकारक आहे. गुंतवणुकीसाठी रोड शो करण्याची गरज काय?, आपण इथे राजकारण करायला आलात. आपल्या राज्याच्या विकासासाठी मुंबईची मदत घेण्यासाठी आलेला आहात. मी आज वृत्तपत्रात वाचले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री हे जागतिक गुंतवणूकदारांच्या कॉन्फरन्सला दाऔसला चालेले आहेत. म्हणजे इथे जाऊन म्हणजे जिथे जाऊन आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दाऔसच्या रस्तावरती. मग हे यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताज महाल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय?, हे बघा राजकारणाचे धंदे बंद करा. आपण आलेला आहात. सन्मानाने आलेले आहात, तर सन्मानाने इथून निघू जा. चर्चा करा, तुमच्या विषय आम्हाला जो प्रेम आदर आहे तो राहिल. शक्यतो इथे येवून राजकीय उद्योग करू नका. मी ऐवढेच त्यांना सांगू इच्छितो”, असा सल्ला राऊतांनी योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

आमच्याकडेचे उद्योग ओरबाडून नेहणार असतील तर आमचा आक्षेप

“मुख्यमंत्री आहेत भेटी होत असतात, परंतु, योगी आदित्यनाथ हे मुंबईमध्ये कशा करता रोड शो करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राऊत पुढे म्हणाले, “मी काल सुद्धा सांगितले. जर योगी आदित्यनाथ हे इथल्या उद्योगपतींना भेटायला आले असतील. त्यांच्या राज्याच्या विकासासंदर्भात काही चर्चा करणार असतील, तर त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही. आमच्याकडेचे उद्योग ओरबाडून नेहणार असतील तर आमचा आक्षेप आहे”,  असा टोला ही त्यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे.

शेवाळेंचा अब्रुनुकसानीच्या दाव्यावर राऊतांची मिश्किल टीका

शिंदे गटाकडून संजय राऊत तुमच्यावर अब्रुनुकसानीचा वादा केला जात आहे, यावर ते म्हणाले, “बापरे, होय का?, मला असे वाटले मुंबईवर अनुबॉम्बच पडला. सोडा ओ, अशा रोज आम्हाला नोटीस येत असतात”, अशी मिश्किल टीका त्यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर अब्रुनुकसानीच्या दाव्यावर केली आहे.

 

 

Related posts

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

News Desk

लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने ३ राज्यात भाजपने पराभव करुन घेतला ?

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | मी टू मी टू नका करु, कानाखाली जाळ काढा !

News Desk