HW News Marathi
महाराष्ट्र

वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, कारण वाघाशी कधी दुश्मनी नव्हतीच!

पुणे | शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. त्यातच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिगत भेट घेतल्याचं समोर आलं तत्यानंतर तर या चर्चे आणखीच सुरू झाल्या. याच शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. आज पुण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यानी शिवसेनेला जणू काही ऑफरच दिली आहे.

“वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच”, असं स्पष्ट आणि थेट विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची वाघाशी दोस्ती आहेच. उद्धव ठाकरे म्हणातात त्यांचं मोदीजींशी जमतं, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जमतं नाही. का ते माहीत नाही. पण वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत”.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचा कोणता प्रश्न सरकारने सोडवला? नारायण राणेंचा मराठा आरक्षणावरून ठाकरेंना टोला

News Desk

“भाजपा राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही”, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

News Desk

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक, कोर्टात करणार हजर

News Desk