HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ED ने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

मुंबई | “भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. मुख्यमंत्र्यांचे महुणे श्रीधर पाटणकर यांच्या ६ कोटी ४५ लाखांची मालमत्तेवर ईडीने जप्त केली आहे. पाटणकरांचे ठाण्यातील ११ फ्लॉट्स (सदनिका) ईडीने सील केले आहे. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ सनदिका ईडीने जप्त केले आहे.

या प्रकरणी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले, “भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे. ईडीकडून झालेली कारवाई हे राजकीय अकसापोटी ही कारवाई केल्याचेही पवारांनी अधोरेखित केले आहे. खरे बोलयाचे तर गेल्या ५ ते ६ वर्षावर ईडी नावाची संस्था कोणाला माहिती नव्हती. परंतु, आता ईडी आता गावोगावी त्यांची माहिती पोहोचली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवार होणे है दुर्दैवीच आहे. बघूया आता काय पर्याय निघतोय का?,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची ईडीने संपत्ती जप्त केल्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सोमय्या म्हणाले, “श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरे यांचा मेहुणा (भाऊ) मनी लाँड्रिंग घोटाळा… शेल कंपन्यांचा वापर करून हा घोटाळा झाला आहे. यामुळे ईडी त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबाजुने सर्व सदस्य एकवटले…

News Desk

शेतक-यांच्या संपाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा: खा. अशोक चव्हाण

News Desk

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल!

News Desk