HW News Marathi
महाराष्ट्र

पंख्याला लटकलेला आढळला वहिणी-दिराचा मृतदे

नाशिक – नाशिकमधील उच्चभ्रु वसाहतीमध्ये दोन जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दीर आणि वहिणीचे हे मृतदेह असल्याने संशय बळावला आहे. पती घरी नसताना ही घटना उघडकीस आल्याने पोलिसांपुढे तपास करण्याचे मोठे आवाहन उभे राहीले आहे. नाशिकच्या मेरी-रासबिहारी रस्त्यावरील एका इमारतीमध्ये राहणारे विकास कुमार यांच्या पत्नी प्रियासिंह आणि भाऊ श्रीरामकुमार सतेंद्र शर्मा यांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. समवयस्क असलेल्या दीर-भावजायीचे मृतदेह पंख्याला लटकले होते. ही घटना गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास उघड झाली. घटनास्थळी पोलिस अधिकारी पोहोचले असून सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.

– प्रियासिंह २७ आणि श्रीरामकुमार २५ या दोघांसंदभार्तील माहिती पोलिसांना त्यांच्या शेजाºयांनी दिली. घनटास्थळी पोहोचलेल्या अधिकाºयांनीी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची प्रथम दर्शनी नोंदवली आहे. – घटनास्थळी दीर-भावजायीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. पती विकासकुमार शर्मा सध्या बाहेर गावी असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो नाशिकच्या दिशेने निघाला आहे. श्रीरामकुमार हा त्यांचा धाकटा भाऊ होता. त्यानेच आपल्या वहिणीचा गळा आवळून ही हत्या केली असावी असा संशय आहे. तरीही घटनेचे कारण काही और असल्याची शक्यता सुद्धा नकारता येणार नाही. पोलिस याबाबत सविस्तर तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आणि विधानांवरच शिवसेना चालतेय, शिवसेनेचे फडणवीसांना प्रत्युत्तर 

News Desk

आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप?

News Desk

‘तिरंदाजीत भारताला पहिलं पदक!’

News Desk