HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaViru : एमसीएची सीईटी परीक्षा ३० एप्रिलला होणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ दिसत असल्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने २८ मार्च रोजी घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता ३० एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयात याबाबत काल (१९ मार्च) आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी सामंत बोलत सांगितले.

सामंत म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सीईटी परिक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटी परिक्षांबाबत ३१ मार्चनंतर राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची

परिस्थिती पाहून सीईटी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, याबाबत शासनाला सहकार्य करावे आणि सर्वांनी कोरोनासंदर्भात स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन सामंत यांनी केले. बैठकीस राज्य सामायिक प्रवेश परिक्षा सेलचे अध्यक्ष श्री. जे.पी डांगे, आयुक्त संदीप कदम, आदी अधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता थेट केंद्रीय आरोग्यमंत्रीच म्हणाल्या, ‘उद्धवजी, मंदिरं उघडा!’

News Desk

मुख्यमंत्र्यांचे हेलीकाॅप्टर अपघातात चार जण जखमी  

News Desk

ड्रग्स प्रकरण : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

News Desk