HW News Marathi
महाराष्ट्र

बीडच्या गेवराईत वाळूपट्ट्यात गस्त घालणाऱ्या महसूल पथकाच्या वाहनाचा दुर्दैवी अपघात!

बीड | बीड जिल्यातील गेवराईत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी गस्त घालून माघारी निघालेल्या महसूल पथकाचे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर धडकले. या अपघातात मंडळ अधिकारी नितीन तुकाराम जाधव (वय ४०, रा. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला तर तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्यासह अन्य एक गंभीर जखमी झाला. हा अपघात गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर आज (६ मार्च) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक होत आहे. हा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने पथक स्थापन केले आहेत. शनिवारी रात्रीपासून बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके व म्हाळसजवळा (ता.बीड) येथील मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचे पथक खासगी ब्रेझा कारमधून (एमएच २३ एडी ४४३५) राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी शनिवारी रात्री गस्त घालत होते. गस्त घालून ते राक्षसभुवन कडून राष्ट्रीय महामार्गाकडे निघाले असता वळणावर चालकाचे ब्रेझा कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली उतरून निलगिरीच्या झाडाला धडकली. या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव जागीच ठार झाले. तर तहसीलदार डोके आणि जाधव यांचा पुतण्या सोनू हे गंभीर जखमी झाले आहेत. तहसीलदार डोके यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.

दरम्यान, मंडळ अधिकारी नितीन जाधव हे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मुंबई प्रदेश सचिवपदी नियुक्त होते. महसूल कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क होता. काही काळ त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचे स्वीय सहायक म्हणून देखील काम पाहिले होते. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्यातील अनेक महसूल कर्मचाऱ्यांनी बीडकडे धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पहाटेच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येणार”, राजू शेट्टींचं सूचक विधान

News Desk

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायले

News Desk

“नागपूरमध्ये जे काही करायचं आहे ते केलं आहे”, फडणवीसांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

News Desk