HW News Marathi
महाराष्ट्र

“जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले जाणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणारच,” राज ठाकरेंचा इशारा

मुंबई | मशिदीवरील भोंगे हे उतरवले पाहिजे. आणि जोपर्यंत हे भोंगे उतरविले जाणार नाही. तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणारच, अशा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसेचे आज (४ मे) आंदोलन करणार होते. या आंदोलनात मशिदीसमोर हनुमान चालिसा लाण्यात येणार होते. राज्यातील काही ठिकाणी मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु,मनसैनिकांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषदे घेत हनुमान चालिसा विषय हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे, असे ते म्हणाले. पोलिसांनी फक्त मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस नोटीस पाठवित आहेत. पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत. ही गोष्टी आमच्या बाबतीतच का होतेय?, असा सवाल त्यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत मशिदीच्या मुद्यांवर सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला तुमच्या मशिदीमध्ये प्रार्थना करायची तर करा. तुम्हाला माईक आणि भोंगा लागतो कशाला. तुम्हाला कोणाला एकवयाचे आहे. यामुळे आमची मागणी आहे की, मशिदीवरील भोंगे हे उतरवले पाहिजे. आणि जोपर्यंत हे भोंगे उतरविले जाणार नाही. तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणारच. आंदोलनाचा विषय हा एका दिवसाचा विषय नाही. हा कायमचा विषय आहे. जोपर्यंत याचा विषय लागत नाही. तोपर्यंत हे असेच चालू राहणार, सरकार जे सांगते ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतोय. करायचे असेल तर पूर्ण करा. त्यांना वाटत असेल तर अजान झाली नाही तर आम्ही खूश होणार नाही, हे जे काही दिवसभरात भोंगे सुरू होतात. ते देखील त्याच डेसिबल्यमध्ये वाजल्या पाहिजे. आणि त्याच्या पेक्षा जास्त लागल्या गेल्या तर आम्ही त्यांच्यासमोर हनुमान चालिसा चालू राहणार. मी काल ही सांगितले आणि आता तेच सांगतो की, हा सामाजिक विषय आणि धार्मिक विषय आहे. याला जर धार्मिक वळण लावण्याचा प्रयत्न केला.”

मशिदीवरील डेसिबल मोजणे हेच पोलिसांचे काम आहे का?

“मला काल विश्वास नागरे पाटील यांनी जे सांगितले की, त्याना परवानगी दिली. तुम्ही त्यांना ३६५ दिवसांची परवानगी कशी काय देऊ शकता. आम्हला परवानगी देताना तुम्ही ठरवीक दिवसांची देणार, सणांना १०-१२ दिवसांची परवानगी देणार आणि यांना ३६५ दिवसांची परवानगी देणार आहे. कशासाठी मला असे वाटते की, त्यांनी पण दररोज परवानगी दिली पाहिजे. आणि ती ही सर्वोच्च न्यायालयाच्या डेसिबल्यच्या अधिकारात राहून. तर प्रश्न असा आहे की, मी पहिले सांगिले होत की भोंगे पहिले खाली उतरवा. पोलिसांना का एकच धंदा आहे का?, रोज जावून डेसिबल्स मोजणार आहे. लोकांनी एवढीच गोष्ट कराची का?,”  असा खोचक सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे. 

सकाळी पाज वाजण्याच्या आधी मशिदींवरील अजान झाली त्यावर पोलिसा कारवाई करणार का?

“मला काल विश्वास नागरे पाटील यांचा फोन आला होता. आणि त्यांनी मला सांगितले की, आम्ही सर्व मशिदींशी बोलेलो आणि मौलवींशी बोलेलो आहोत. ते कोणी सकाळीच अजान लावणार नाही. मग या ज्या १३५ मशिदींवरील जी अजान सकाळी ५ वाजण्याच्याआधी झाली. यावर राज्य सरकार कोणती करवाई करणार आहे की, फक्त आमच्या लोकांवर कारवाई करून उचलणार आहेत. एक विषय आपण समजून घेतला पाहिजे. हा विषय श्रेय घेण्याचा नाही, आमच्या मुळे झाले की कोणा मुळे झाले. सामज्यांनी सर्वांनी हा विषय हाताळला तर हा विषय सगळ्यांचा आहे. फक्त आज आमच्या मुळे ९२ ठिकाणी आज अजान झाले नाही, याचे श्रेय आम्हाला घ्याचे नाही. आणि त्यांची इच्छापण नाही. आम्ही हे फक्त बोललो तुम्ही ही गोष्ट दाखवली. लोकांपर्यंत पोहचविलीत. लोकांनीही मान्य केली. ज्या मशिदी होत्या त्यातील मौलवी होते. त्यातील अनेक मशिदीतील जो मौलवी आहेत, त्यांना हा विषय समजला आणि त्यांच्यापर्यंत तो पोहोचला. सरकारपर्यंत पोहोचला आणि पोलिसांना ही मी धन्यवाद देईन,” असेही राज ठकारे म्हणाले 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाधवान कुटुंब महाबळेश्वरला कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने गेले, सीएम आणि गृहमंत्र्यांना फडवीसांचा सवाल

News Desk

“खाकी वेषातील दरोडेखोर परमबीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं”- हसन मुश्रीफ

News Desk

“अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो”- अजित पवार

News Desk