HW News Marathi
महाराष्ट्र

कावेरी पाणी वाटपासाठी ३ मे रोजी सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी

नवी दिल्ली | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या दहा दिवसाआधी 3 मे ला कावेरी पाणी वाटपावर पुढील सुनावणी होणारच सुप्रीम कोर्टाने सोमवारी कावेरी पाणी वाटपाच्या निकालाची अंमलबजावणी कशी करणार याचा कच्चा मसुदा येत्या ३ मे पर्यंत सादर करावा, असा आदेश केंद्र सरकारला दिला आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने कावेरी पाणी प्रश्नावर निकाल दिला. कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कावेरी पाणी वाटप अद्याप अंतिम रुप का देता आले नाही, हे आम्हाला माहित नाही. पण, तुम्ही चांगल्या पध्दतीने मांडणी करुन कोर्टाने दिलेल्या अंतिम तारखेच्या आधी कच्चा मसुदा जमा करावा. जर याची मांडणी करताना तुम्हाला गोंधळ वाटत होता. तर तुम्ही आधी आमच्याकडे का आला नाहीत ? असा सवाल खंडपीठाने ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना केला.

केंद्र सरकारने दाखल केलेल्या स्पष्टीकरण अर्जाचा हवाला देऊन, वेणुगोपाल म्हणाले, या योजनेच्या आशयाचे वेगवेगळे विचार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, कावेरी पाणी ट्रिब्यूनलच्या आदेशानुसार ही योजना सक्तीने असली पाहिजे का? असेही वेणुगोपाल यावेळी म्हणाले.

खंडपीठाने असेही सांगितले की या प्रकरणात आणखी सुनावणी होणार नाही. तामिळनाडूला त्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने असे सुचवले की केंद्र सरकारला कायद्याचे पालन करणे बंधनकार आहे. राज्यांतील पाणी वाटपाचे व्यवस्थापन करण्यासाठी योजना आखली आहे. खंडपीठाने कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सक्षम अधिकार्यांना राज्यांमध्ये शांतता राखण्याचे आदेश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं नाही, याचं भान अर्थमंत्र्यांनी ठेवलं”!

News Desk

“तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?”, आदित्य ठाकरेंना संतप्त नागरिकांचा सवाल

News Desk

१०वी-१२वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, विद्यार्थ्यांना अफवांना बळी न जाण्याचे आवाहन

News Desk
मुंबई

उत्तर भारतीयांच्या मागे उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे

News Desk

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे आहेत असे वक्तव्य शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनात ते बोलत होते. आमदार प्रकाश सुर्वे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष हेमंत पांडे, प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित राहिले होते. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उत्तर भारतीय मतदारांना साद घालताना पहायला मिळत आहे.

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत जेंव्हा उत्तर भारतीयांना मारपीठ झाली त्यावेळी, आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. शिवसेना पक्ष सदैव उत्तर भारतीयांच्या पाठीशी उभा आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे असून अनेक उत्तर भारतीयांना शिवसेनेत महत्वाची पद देण्यात आल्याची आठवण सुद्धा शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला यावेळी करून दिली.उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनाला विशेष भोजपुरी रंगा रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादव आणि प्रसिद्ध अभिनेत्री रितू सिंह यांची विशेष उपस्थिती होती.

Related posts

बनावट किन्नर विरोधात कारवाई करा- किन्नर माय ट्रस्टची मागणी

News Desk

सिंधिया हाऊस इमारतीला आग

swarit

हा विजय वेगळाच – उद्धव ठाकरे

News Desk