HW News Marathi
महाराष्ट्र

Live Update : पुढची रणनीती सविस्तर चर्चेनंतर ठरविणार | महाआघाडी

मुंबई | शिवसेनेला दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यापाल भगतसिंग कोश्यारी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यापालांनी आज (११ नोव्हेंबर) ७.३० वाजेपर्यंतची वेळीची मर्यादा देण्यात आली आहे. शिवसेनला स्थापन करण्यासाठी अवघे २३ तासांचा कलावधी मिळाला आहे. यानंतर शिसवेनेत राजकीय हलचालींना वेग आला आहे.

“शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळू नये, म्हणून भाजप विरोधी पक्षात बसायला देखील तयार आहे. मात्र, ठरल्याप्रमाणे शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. “शिवसेनेविरोधात भाजपचे षडयंत्र असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.” “शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का?,असा सवाल पत्रकारांनी विचारल्यानंतर राऊत म्हणाले की, तुम्हाला जे समजाचे आहे ते समजा असे म्हणाले. राऊतांनी आज (११ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

Live Update

  • राज्यपालांनी आता आम्हाला खूप वेळ दिला | शरद पवार
  • शिवसेनेने ११ नोव्हेंबर रोजी अधिकृतरीत्या महाआघाडीशी संपर्क साधला
  • पुढची रणनीती सविस्तर चर्चेनंतर ठरविणार | महाआघाडी
  • काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद सुरु
  • सत्तास्थापनेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत बैठक सुरु
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आमदारांच्या भेटीसाठी हॉटेल ‘रिट्रीट’मध्ये होणार दाखल
  • थोड्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक
  • शिवसेनेच्या याचिकेवर बुधवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
  • राज्यात ६ महिन्यांच्या कालावधीकरिता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
  • राष्ट्रवादीच्या मुदतवाढीच्या मागणीमुळे राज्यपालांची राष्ट्रपतींकडे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्याची मागणी
  • राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या ‘राष्ट्रवादी’ने सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे ३ दिवसांची मुदत मागितली होती.
  • महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू
  • सरकार स्थापन व्हावं म्हणून सर्व प्रयत्न केले | राज्यपाल
  • राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली
  • काँग्रेस नेते मुंबई दाखल, शरद पवारांशी करणार चर्चा
  • गृहमंत्रालयाची सायंकाळी ५.३० वा. पत्रकार परिषद, राष्ट्रपती राजवटीची घोषणा शक्याता
  • राष्ट्रवादी काँग्रेस वेळ वाढवून मागितल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली
  • या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवसाची मुदत वाढविण्याची मागणी केली
  • वेळ न वाढून दिल्याने शिवसेनेने हा निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
  • “आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही. आम्ही जो काही निर्णय घेऊ तो काँग्रेससोबत चर्चा करूनच घेऊ”, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.
  • राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थतीच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकार शरद पवार यांना बहाल. शरद पवार समिती स्थापन करून पुढचे निर्णय घेणार”, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
  • शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार आहेत
  • राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रपती रामनाथ गोविंदकडे मागणी केली.
  • भाजप नेते आशिष शेलार संजय राऊत यांच्या भेटीला, शेलारांकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊतांची भेट घेण्यासाठी लिलावतीमध्ये दाखल
  • शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्विकारला आहे. त्यानंतर, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे
  • वाय. बी चव्हाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात,
  • काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधई यांच्या निवसस्थानी बैठक, राजकीय हलचालींना वेग
  • संजय राऊतांची भेट घेऊन शरद पवार लीलावततून निघाले
  • काँग्रेसची दिल्लीतील कोअर कमिटीची बैठक रद्द
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात पाहण्यासाठी रवाना झाले आहे.
  • आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहात होतो, त्यांचे पत्र मिळाले नाही, दोघे मिळून निर्णय घेऊ – अजित पवार

  • “लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’ बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…, असे ट्वीट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.

  • आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठक, दिल्ली काँग्रेसची बैठक

आज (१२ नोव्हेंबर) राजकीय घडामोडी

  • भाजप वेट अन्ड वॉचची भूमिकेत असल्याचे सुधीर मुगनंटीवार यांनी दिली आहे.

    राष्ट्रवादीचे गेटनेते अजित पवार आणि आमदार धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी राज्यपालांची भेट घेतील आज सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे

  • राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. आज (१२ नोव्हेंबर) वेळी दिली
  • काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित निर्णय घेईल, तीन तासाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे
  • वेळ वाढून देण्यास राज्यपालांना नकार, मुदतीस सरकार स्थापन करण्या शिवसेना अपयशी,
  • शिवसेने वेळ मागितली होती, मात्र, राज्यापालांकडे वेळ वाढून मागितील होती, मात्र, राज्यपालांनी वेळ नकार दिला आहे
  • सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने दावा केला असल्याचे युवा नेता आदित्य ठाकरेंनी पत्रकार सांगितेल
  • काँग्रेसच्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले
  • काँग्रेसचे पत्रक काढले, मात्र, या काँग्रेसच्या पत्रात शिवसेनेला पाठिंबा दिल्ल्याचा उल्लेख केला नाही.
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिस्थीला शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार
  • काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सत्ता स्थापनेचा पाठिंबा देणार

  • सत्ता स्थापनेच्या दावा करण्यासाठी युवा नेता आदित्य ठाकरे, शिवसेना नेता एकनाथ शिंदे राजभवनात दाखल
  • शिवसेनला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
  • काँग्रेसकडून पाठिंबा मिळाल्याचा शिवसेनेकडून दावा असल्याची माहिती मिळाली आहे
  • शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे राजभवनाच्या दिशेने रवाना
  • गेल्या दीड तासांपासून काँग्रेसची बैठक सुरू, बैठकीदरम्यान सोनिया गांधीं राज्यातील आमदारांसोबत फोनवरून संवाद साधला
  • कोणत्याही क्षणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत युवा नेता आदित्य ठाकरे राजभवनात दाखल
  • राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार माध्यमांशी बोलणार
  • काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवास्थानी काँग्रेसची बैठक सुरू, या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अहमद पटेल
  • शिवसेना नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा वेळ वाढून घेण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
  • शिवसेना खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल
  • उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार
  • सोनिया गांधी महाष्ट्रातील ६ नेत्यांशी चर्चा करणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबर थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे आदी आदी नेत्यांशी चर्चा करा !
  • भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली, सायंकाळी ५ वाजता पुन्हा एकदा भाजपची बैठक
  • शिवसेनेचा राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव, सत्तास्थापनेसाठी पाठिंब्याची मागणी
  • “निवडणुकांनंतर आमच्या विश्वासार्हतेला तडा गेला. लोकसभेपूर्वीच युती तुटणार होती. आता मात्र उद्धव ठाकरेंना खोटे ठरविण्याचा प्रयत्न झाला. मी माझ्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सोपविला आहे”, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया.

  • अखेर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
  • वांद्र्यातील ‘ताज-लँड्स’मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरु

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक, या निवास्थानी भेटीसाठी रवाना झाले आहेत
  • काँग्रेसचा निर्णय झाल्यानंतर आमचा निर्णय होईल, नवाब मलिक
  • शिवसेनेच्या अरविंद सावंत यानी राजीनामा दिला असून एनडीएमधून बाहेर पडण्याचे शिवसेनेने पाऊल टाकले असल्याचे मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले.

  • शरद पवार दिल्लीला जाणार नाही, उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
  • काँग्रेसच्या जो निर्णय असे तोच आमचा निर्णय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी सांगितले
  • राष्ट्रवादी-काँग्रेसची एकच भूमिका असेल
  • राष्ट्रवादी काँग्रेस ४.३० वाजता निर्णय सांगणार आहे
  • कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय अद्याप झालेला नाही.
  • काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठीत काँग्रेस शिवसेनेला पाठिंबाबात सायंकाळी ४ वाजता निर्णय घेणार

  • भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात, बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र निवडणुकीचे प्रभारी भूपेंद्र यादव, आशिष शेलार,
  • थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक, गेल्या दीड तासापासून राष्ट्रवादीची बैठक सुरू
  • शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार
  • भाजपचे शिवसेनेविरोधात षडयंत्र असल्यामुळे भाजपसोबत राहणार नाही, असे सांगित एनडीएतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत राऊतांनी दिले आहेत.
  • “भाजप विरोधात बसण्यास तयार आहेत. मात्र, ठरल्याप्रमाणे शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही, असा आरोप राऊतांनी भाजपवर केला आहे.
  • “राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊन राज्याला स्थिर सरकार देऊ,” असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
  • “भाजप सत्ता स्थापन करून शकले नाही, म्हणून याचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे असून निवेदन दु:खद आणि खेदजनक”, असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राऊत यांनी आज (११ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत भाजपवर ताशेरे ओढले आहे.
  • महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत राजकीय परिस्थितीबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीत बैठक, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेसची बैठक
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्याशी फोनद्वार चर्चा, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत राजकीय परिस्थितीची माहिती दिली, दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी चर्चा
  • भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, वर्षा बंगल्यावर दुपारी १२ वाजता होणार बैठक
  • “शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी १० वाजता राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसची चर्चा करून निर्णय देणार
  • ‘रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

  • शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी ट्वीट करत केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी कधीही मातोक्षीवर फोन केला नाही”, नारायण राणेंचे विनायक राऊतांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची आज ईडी चौकशी होणार

News Desk

नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद यशस्वी

News Desk