HW News Marathi
महाराष्ट्र

ऑक्सिमीटर आणि डिजिटल थर्मामीटरच्या किमती झाल्या कमी

नवी दिल्ली | केंद्र सरकारने कोरोनाच्या उपचार आणि प्रतिबंधात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या उपकरणांच्या किंमतीत मोठी कपात केली असल्याचं समोर आलंय. ऑक्सिमीटर आणि डिजिटल थर्मामीटर सारख्या पाच अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांवर केंद्र सरकारने व्यापाराचा नफा ७० टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. जवळपास ६२० ब्रँडची आतापर्यंत विक्री झाली आहे. शनिवारी रसायन व खत मंत्रालयाने सांगितले की ही मर्यादा २० जुलैपासून लागू करण्यात आली आहे. या उपकरणांची किंमत कोरोना काळात कमी केल्यामुळे सामान्यांच्या खिशाला बसणारा चटका हा काही प्रमाणात कमी झाला आहे. या उपकरणांची मागणी आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे याचा पुरवठाही सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे.

केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने केलेल्या ट्वीट नुसार मोठ्या जनहितार्थ, सरकार पल्स ऑक्सिमीटर, रक्तदाब मॉनिटरिंग मशीन, नेब्युलायझर, डिजिटल थर्मामीटर, ग्लूकोमीटर वैद्यकीय उपकरणांसाठी व्यापार मार्जिन मर्यादित करते. हे २० जुलैपासून लागू झाले आहेत आणि वैद्यकीय उपकरणांच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. १३ जुलैला नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने ड्रग्स प्राइस कंट्रोल ऑर्डर २०१३ च्या पॅरा १९ अंतर्गत देण्यात आले आहे. ऑक्सिमीटर, ग्लूकोमीटर, बीपी मॉनिटर, नेब्युलायझर आणि डिजिटल या पाच वैद्यकीय उपकरणांना मान्यता दिली आहे. यामुळे ट्रेडिंग मार्जिनवर मर्यादा प्राइस टू डिस्ट्रिब्यूटरच्या (पीटीडी) पातळीवर किंवा वितरकाला दराच्या किंमतीवर ७० टक्के नफा झाला.

२३ जुलै २०२१ पर्यंत ६२० उत्पादनांमध्ये यांनी मॅक्सिमम रिटेल प्राइसमध्ये कपात केल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पल्स ऑक्सिमीटरच्या आयातीत ब्रँडद्वारे जास्तीत जास्त कपात केल्याची नोंद आहे. यामध्ये प्रति युनिट २,९५,३७५ रुपयांची घट दिसून आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की आयात आणि देशांतर्गत ब्रँडच्या सर्व श्रेणींमध्ये एमआरपीमध्ये घट झाली आहे. पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मशीन आणि नेब्युलायझरच्या किंमतींमध्ये आयातदारांनी सर्वात मोठी कपात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही’, उद्धव ठाकरेंचं विधान

News Desk

‘लोकांनी तारतम्य बाळगावे’, शरद पवारांची विनंती!

News Desk

ब्रेकिंग! मॉलमधील राड्याप्रकरणी अखेर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

Manasi Devkar