HW News Marathi
महाराष्ट्र

शिक्षण विभागाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई | कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. यंदा सुद्धा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे सावट इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा होणार की नाही?, यावर प्रश्न निर्णमा झाला आहे. शिक्षण विभागाकडून  इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच बारावीच्या परीक्षा दहावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्चदरम्यान तर दहावीच्या परीक्षा  १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी देखील आज (२१ डिसेंबर) ट्वीट यासंदर्भात माहिती दिली आहे. 

यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

असे आहे बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक

  • ४ मार्च – इंग्रजी
  • ५ मार्च – हिंदी
  • ७ मार्च – मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलुगू इ.
  • ८ मार्च – संस्कृत
  • ९ मार्च – वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
  • १० मार्च – भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र
  • ११मार्च – चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
  • १२ मार्च – रसायनशास्त्र
  • १४ मार्च – गणित आणि संख्याशास्त्र
  • १५ मार्च – बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान
  • १६ मार्च – सहकार
  • १७ मार्च – जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास
  • १९ मार्च – भूशास्त्र, अर्थशास्त्र
  • २१ मार्च – वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म
  • २२ मार्च – अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण


असे आहे दहावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक


  • १५ मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
  • १६ मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा
  • १९ मार्च – इंग्रजी
  • २१ मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • २२ मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा)
  • २४ मार्च – गणित भाग – १
  • २६ मार्च – गणित भाग २
  • २८ मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
  • ३० मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
  • १ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर १
  • ४ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर २
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित

News Desk

जाणून घ्या… उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार ?

News Desk

दोन तरुणांनी गमावला जीव. पहा लाइव्ह..

News Desk