HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या”‘ मुख्यमंत्र्यांकडे धक्कादायक मागणी!

मुंबई। एमपीएससी परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. यानंतर राज्य सरकारवर आता विरोधकांकडून टीका करण्यात येते. अशातच आता राज्यातील आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. डॉक्टरांनी अस पत्र लिहिलं आहे की, आत्महत्येला परवानगी द्यावी अशी धक्कादायक मागणी या मानसेवी डॉक्टरांकडून करण्यात आली.

२८१ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. स्वप्नील लोणकरसारखे आम्हीही पुरते निराश आहोत अशी भावना आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

“मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारकडून गेली दोन दशकं राबवलं जातंय. या डॉक्टरांचं मानधन २४ हजारांहून थेट ४० हजार करण्याचा निर्णय १६-०९-२०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र याला ११ महिने उलटून देखील या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यासाठीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत असून एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा किंवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या.” अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

“२४ हजार रूपयांमध्ये कुटुंब चालवणं कठीण आहे. आणि यातील काही डॉक्टरांनी आत्महत्या केल्यानंतर सरकार जागे होणार आहे का? या डॉक्टरांना कधीच न्याय मिळणार नाही का? उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसंच आदिवासी मंत्री मानधनवाढीचा निर्णय घेतात मग त्याची अंमलबजावणी कोणी करायची? १६ आदिवासी जिल्ह्यात दुर्गम भागात काम करणाऱ्या २८१ डॉक्टरांना न्याय देणार?” असे सवालही डॉक्टरांनी पत्राद्वारे केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्युत वाहिनीवर टॉवर पडल्याने वीजपुरवठा खंडित

News Desk

लोकशाहीची पायमल्लीच करण्याचे सरकारने ठरविले!

Aprna

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवून देण्यासाठी तुम्हीही केंद्राकडे पाठपुरावा करा – उध्दव ठाकरे

News Desk