मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव नुकताच निवळला आहे. काँग्रेसच्या नेत्यांची काल (१८ जून) मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक झाल्यानंतर काँग्रेसची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात एकीकडे असे चित्र असताना भाजप मात्र वेगळीच रणनीती आखताना दिसत आहे. महाविकासआघाडीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मोठे विधान केले आहे. “जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यातील ठाकरे सरकारला दिलेले समर्थन काढून टाकले तर राष्ट्रहितासाठी भाजप ठाकरे सरकारला पाठिंबा देईल”, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामींनी केले आहे. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामींच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
If Congi and NCP withdraw support from Uddhav government then in the national interest BJP must extend support and re-form NDA govt in Maharashtra
— Subramanian Swamy (@Swamy39) June 18, 2020
सुब्रमण्यम स्वामींनी यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात रस दाखवला होता. २० मे २०२० रोजी सुब्रमण्यम स्वामींनी केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. सुब्रमण्यम स्वामींनी त्यावेळी एक बातमी ट्विट केली होती. ‘The Corona Crisis: President’s Rule, the only way out in Maharashtra?’ असे या बातमीचे शीर्षक होते. पुढे यावर आपले मत मांडताना सुब्रमण्यम स्वामींनी असे म्हटले होते कि, “आताच योग्य वेळ आहे पुढे तशी वेळ येणार नाही. उद्धव ठाकरे आताच महाविकासआघाडी तोडा नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला उध्वस्त करून टाकतील.” भाजपच्या केंद्रातील नेत्याने महाराष्ट्रातील राजकारणाबाबत उघडपणे मत व्यक्त केल्याने तेव्हाही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.
The Corona Crisis: President’s Rule, the only way out in Maharashtra? https://t.co/4KKOraQpw8 via @PGurus1 : My view: “Time is now or never: Uddhav break the alliance now otherwise NCP and Congress will destroy you by staged events”
— Subramanian Swamy (@Swamy39) May 20, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.