HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता !, फडणवीसांचा टोला

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर टीका करताना टोला लगावला आहे. “राज्यसभेत जर त्या खासदारांनी तसे वर्तन केले नसते तर शरद पवारांना आज अन्नत्याग करावा लागला नसता”, असे फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे, “शरद पवारांनी कृषी विधेयकाला विरोध केलेला नाही तर उलट कृषी विधेयकावरून  राज्यसभेत जो गदारोळ झाला त्याबाबत उपोषणाला बसलेल्या खासदारांच्या कृतीचे समर्थन केले आहे”, असे विधान फडणवीसांनी केले आहे. ते आज (२२ सप्टेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवारांचा आज दिवसभर अन्नत्याग 

“मी गेली अनेक वर्ष संसदेत काम करतोय. मात्र, आताच विरोधकांच्या मतांना किंमत न देता बहुमताच्या जोरावर कायदे संमत करण्याची प्रथा सुरू झालेली दिसत आहे. रविवारी सभागृहात विरोधक बोलत असताना, चर्चा करण्याची मागणी करत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून विधेयक रेटून नेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर, विधेयकाला विरोध करणाऱ्या खासदारांचं निलंबनही करण्यात आलं. हे निलंबन अयोग्य आहे. या खासदारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिवसभर मी देखील अन्नत्याग करणार आहे”, असे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले

Related posts

महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट ? भाजपकडून विशेष प्रयत्न

News Desk

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्याला ‘दहशतवादी’ म्हणणं हाच मोठा विनोद!

News Desk

मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर…!

News Desk