HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या विधानसभेत सेना-भाजप स्वतंत्र लढतील यात शंकाच नाही !

मुंबई । शिवसेना-भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. आघाडीतून आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, या इनकमिंगबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. “भाजप-शिवसेना युतीकडून ज्या प्रकारे अन्य पक्षातील लोकांना पक्षात घेतले जात आहे, ते पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील, यात जराही शंका नाही”, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

“शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेले इनकमिंग पाहता येत्या विधानसभेत शिवसेना-भाजप युती राहणार नसून हे दोन्ही आहेततंत्र लढतील”, असा स्पष्ट दावा जयंत पाटील यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, “शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना आपण सत्तेवर येऊ याची खात्री नसल्याने ते मोठ्या प्रमाणावर अन्य पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेत आहेत. मात्र, राज्यातील जनता आता पक्षांतर करणाऱ्या आणि ते करून घेणाऱ्यांना कंटाळली आहे. येत्या विधानसभेत या दोन्ही पक्षांना जनता त्यांची जागा दाखवेल”, असेही जयंत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी शासकीय आणि खासगी भागिदारी धोरणाला मंजुरी’ -अमित देशमुख

News Desk

राज्यात सत्तांतरानंतर ‘गोकुळ’ला अच्छे दिन, नवी मुंबईत दिली जागा, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना “मनसे” इशारा, तुमच्या देशात निघून जा !

swarit