HW News Marathi
Covid-19

सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना विचार करा, नाहीतर …!

मुंबई | “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत सायबर क्राइम विभागाने ४१० गुन्ह्यांची नोंद केली आहे, तसेच २१३ जणांना यासंदर्भात अटक केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकताना सर्वांनी काळजी घ्यावी. अन्यथा सायबर क्राइम विभाग आपल्यावर कडक कारवाई करेल”, असा कडक इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (२३ मे) दिला आहे. अनिल देशमुख यांनी एक व्हिडीओ शेअर याबाबत सूचना केल्या आहेत. “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सायबर क्राइममध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडियावरून महिला अत्याचाराला उत्तेजन देणारे, त्याचप्रमाणे धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि पोस्ट्स व्हायरल केल्या जात आहेत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही”, असा स्पष्ट इशारा राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/331093214540374/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारने जून-जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन तयारी करावी !

News Desk

महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या, शरद पवारांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

News Desk

भाजपला जडला महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग !

News Desk