HW News Marathi
महाराष्ट्र

भगीरथ भारतनाना भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे !

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा आज रांजणी, पंढरपूर येथे शुभारंभ करण्यात आला. भगीरथ यांंना विजयी करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघाने मेहनत घेत आहे. मला खात्री आहे की रात्रीचा दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विजय मिळवेल,असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की,आज भाजपने इथे उमेदवार दिला आहे. भारतनाना विरोधी पक्षाचे आमदार होते तेव्हा भाजप सरकारने या मतदारसंघाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. ३५ गावांचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघातील इतर प्रश्न असतील, नानांनी प्रत्येक वेळी भाजपशी संघर्ष केला.आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांगलादेश स्वातंत्र्याचं संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचं आहे, तिथेही आपण बांगलादेश स्वतंत्र लढ्यात होतं असं सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे. आज पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी बांधव दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला त्यावर बोलण्यास वेळ नाही. आज नोकरदारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाही, तरुणांच्या हाताला काम देण्याची सरकारकडे कुवत तर नाहीच पण आहे त्या नोकरीवरही मोदी सरकारने टांगती तलवार ठेवली आहे.
महाराष्ट्र सरकार कसं अडचणीत येईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, काही घटनांचा आमच्या हातात जर तपास असता तर तात्काळ या घटनांमागे कोण आहे हे हुडकून काढलं असतं मात्र तपास एनआयएकडे आहे. हा तपास संथगतीने सुरू आहे का असा प्रश्न आता पडतोय. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार असल्या कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही, ना आमच्या सरकारमध्ये असल्या गोष्टी खपवून घेतल्या जातील,असा सज्जड दम आज त्यांनी विरोधी पक्ष भाजपला दिला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे मंगळवेढ्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करत आहेच पण अजित दादांनी आज सांगितले आहे. संपूर्ण सरकार भगिरथच्या मागे उभे राहणार आणि मंगळवेढ्याच्या विकासात तसूभर गोष्टीही कमी पडू देणार नाही. आज राज्यावर कोरोनाच संकट आहे, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आम्ही तिघेही एकदिलाने या संकटाचा सामना करत आहे. या मतदारसंघातही आम्ही एकदिलाने लढतो आहे त्यामुळे भगीरथचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,असा निर्धारही त्यंनी बोलून दाखवला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल – अजित पवार

Aprna

३०० कोटींचा मालक ५-६ कोटींसाठी आत्महत्या करतो? हे पटण्यासारंखं नाही – निलेश राणे

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू! कॉंग्रेस नेत्याच्या निकटवर्तीयांचा आरोप

News Desk