HW News Marathi
महाराष्ट्र

स्वतःचे अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे हे वक्तव्य ! | अजित पवार

मुंबई | “पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. त्यामुळे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार”, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (४ फेब्रुवारी) केली आहे. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यावर बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

“केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही त्यामुळे राज्य सरकारबद्ल फडणवीस असं वक्तव्य करत आहेत. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल १०० रुपये लिटर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नये”, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. त्याचप्रमाणे, यावेळी अजित पवार यांनी वीज दराबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबतही भाष्य केले आहे.

वीज दराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शेतकऱ्यांची ४५ हजार कोटीची थकबाकी होती, त्यातील केवळ १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. ३० हजार कोटी रुपये माफ केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. “वीज कंपन्या अडचणीत असतानाही ३० हजार कोटी रुपये माफ करून अडचणीत असलेल्या जनतेला राज्य सरकारने आधार दिलाय. त्यामुळे तोंडदेखल आंदोलन भाजप करतंय” असेही अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिडकोच्या घरांसाठी बम्पर लॉटरी जाहीर

swarit

सचिन वाझेंनंतर अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांचीही हकालपट्टी करा ! | किरीट सोमय्या

News Desk

इमानी कोण करतंय हे देशातील लोकांना समजते, नाना पटोलेंची भाजपवर टीका

News Desk