मुंबई | देशात सध्य कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. तर दुसऱ्या बाजूला यंदा पाऊस सरासरीच्या १०० टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. तर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरीच्या ९६ ते १०० टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने आज (१५ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितला आहे.
This year we will have a normal monsoon. Quantitatively the monsoon rainfall, during the monsoon season 2020, is expected to be 100% of its long period average with an error of +5 or -5% due to model error: Madhavan Rajeevan, Secretary, Ministry of Earth Sciences (MoES). pic.twitter.com/gjgM0Ta1N8
— ANI (@ANI) April 15, 2020
या वर्षात पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या १०० टक्के असेल, तर मॉडेलच्या त्रुटीमुळे ५ किंवा -५ टक्के असा त्रुटी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी दिली आहे. या कालावधीमध्ये अल निनोमुळे होणारा परिणाम सामान्य असेल. पावसाच्या चारही महिन्यांमध्ये हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे पाऊस चांगला होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
हवमान विभागच्या अंदाजानुसार चांगला पाऊस पडला तर बळीराजासाठी ही आनंदाची बातमी आहे. सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामकाज ठप्प आहेत. मात्र, शेतीच कामे नियमित सुरू आहे. दरम्यान, मान्सून १ जूनच्या आसपास केरळच्या तिरुअनंतपूरममधून आगमन करेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.