राजस्थान | उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये काल (११ जुलै) वीज कोसळून नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये आमेर महलाच्या टॉवरवर वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाज आणि कानपूर अशा वेगवेगळ्या ठिकणी वीज कोसळून ३० जणांचा मृत्यू झालाय. राजस्थानातली घटना ही आजवरची सर्वात धक्कादायक घटना मानली जात आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना अनेक जण सेल्फीसाठी टॉवरवर चढले होते. यावेळी टॉवरवर वीज कोसळली. आणि सेल्फीसाठी टॉवरवर चढलेले लोक वीजेच्या धक्क्यानं आजबाजूच्या जंगलात उडाले.
Rajasthan Chief Minister Ashok Gehlot expressed deepest condolences to the families of those who lost their lives due to lightning in Kota, Dholpur, Jhalawar, Jaipur, and Baran districts, yesterday pic.twitter.com/uoRI7yAr1X
— ANI (@ANI) July 11, 2021
प्रशासनाकडून ५ लाखाची मदत जाहीर
राजस्थान मध्ये वीज कोसळून मृत्यू झालेल्या पीडितांना प्रशासनाकडून ५ लाखाची मदत जाहीर झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वीज कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, “कोटा, धौलपूर, झालावाड, जयपूर आणि बारांमध्ये आज वीज कोसळल्यामुळे दुर्दैवी घटना घडली. पीडित कुटुंबियांबद्दल मी मनःपूर्वक शोक व्यक्त करतो, देव त्यांना या दुखातून सावरण्यासाठी शक्ती देईल. पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.”
राजस्थान के कुछ इलाकों में आकाशीय बिजली गिरने से कई लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है। इससे अत्यंत दुख हुआ है। मैं मृतकों के परिजनों के प्रति अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 12, 2021
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
राजस्थानमधील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेकांनी प्राण गमावले आहेत. यामुळे दुःख झालं आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.