HW News Marathi
महाराष्ट्र

आज स्त्री शिक्षणाचे दालन खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची जयंती

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. ज्या काळात स्त्रीने चुल-मुल या चौकटी बाहेर पडणे, तर सोडाच पण त्याचा विचार करणेही पाप मानले जात होते. त्या काळात महात्मा जोतिराव फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. यानंतर सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी खंडोजी आणि लक्ष्मीबाई नेवसे पाटील यांच्या पोटी झाला. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतीबारावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना “फुले” हे आडनाव त्यांना मिळाले.

समाजातील इतर स्त्रीयांना शिक्षण देण्याआधी ज्योतिबांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना ज्ञानाचे धडे देण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर या दाम्पत्यांनी मिळून मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाडा येथे सुरू केली आणि त्यांच्या पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंचा शिक्षणातील प्रवास सुरू झाला.

शिक्षणाला विरोध करणाऱ्या, समाजातील अनेक जाचक विचारांना न जुमानता फुले दाम्पत्यांनी दलित आणि मुस्लिम मुलींसाठीही शिक्षणाचे दालन खुले केले. मुलींची शाळेतील कमी संख्या व अधिक गुणवत्ता, पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटविण्यासाठी साक्षरता अभियान असे अनेक प्रयत्न शिक्षण क्षेत्रात त्यांनी केले. १८५२ साली ज्योतीरावांच्या व सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याबद्दल सरकारी शिक्षण खात्याकडून त्या दोघांचा मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार करण्यात आला होता.

आजच्या एकविसाव्या शतकात शिक्षणाचे आणि मुख्यत: स्त्री शिक्षणाचे महत्त्व तर आहे. पण अजूनही तळागाळातल्या ठिकाणी ते पोहोचले नाही आहे, आणि याची दखल सरकार किंवा कोणतेही माध्यम घेत नाही आहेत. ज्या मातेने शिक्षणाचा अनमोल ठेवा आपल्या समाजाला दिला तो ठेवा जतन करणए ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे आणि आपण ते जपले पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, अशोक चव्हाणांनी व्यक्त केली नाराजी

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवल्यासंदर्भात अधिसूचना जाहीर

News Desk

“मी राजवाडा सोडून शेतकऱ्याच्या बांधावर आलोय, मंत्र्यांनी यावं की नाही हा त्यांचा प्रश्न” – संभाजीराजे

Manasi Devkar