HW News Marathi
महाराष्ट्र

“सत्कार करायला धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहेत का?”, तृप्ती देसाईंचा सवाल

बीड । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या वृत्तानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाट झालेली असताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या वादात उडी घेत धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “सत्कार करायला धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहेत का?”, असा सवाल उपस्थित करत “धनंजय मुंडेंचा जंगी सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे”, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

बलात्कार प्रकरणातील आरोप आणि वैयक्तिक जीवनाबाबतच्या खुलाशानंतर धनंजय मुंडे जेव्हा प्रथमच आपल्या जिल्ह्यात गेले तेव्हा स्थानिकांकडून त्यांचा सत्कार झाला आणि जल्लोषात स्वागत झाले. यावर, तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली आहे. “एखादा पराक्रमी योद्धा असल्याप्रमाणे धनंजय मुंडे यांचे स्वागत केले जात आहे. परंतु त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना २ मुले आहेत याबाबतची कबुली त्यांनी स्वतःच दिलेली होती. त्यानंतर रेणू शर्मा यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला होता. त्यानंतर आता पुन्हा जर करुणा शर्मा यांनी अशी तक्रार केली असेल तर धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल. कारण, असेच सुरु राहिले तर काही काळानंतर चुकीचा पायंडा पडेल”, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Aprna

सरकारचं डोकं सरकलय की काय ? निलेश राणेंचा पुन्हा एकदा राज्य सरकारवर प्रहार

News Desk

आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य नाही! – नाना पटोले

Aprna