मुंबई | सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी देशातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. हा संप आज (१५ मार्च) आणि उद्या (१६ मार्च) असणार आहे. या संपाचा बँकिंग सुविधांवर मोठा परिणाम होऊ शकतो. संपामुळे चेक क्लीअरन्स किंवा लोन मंजुरी सारख्या सुविधांना अडचण येऊ शकते. युनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियनने याबाबत माहिती दिली आहे. या यूनियनमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या ९ संघटना सहभागी आहेत. दोन दिवसीय संपात देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी संपावर जातील, असा दावा युनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियनने केला आहे.
केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरातील बँका कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर आहेत. सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी देशातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. आज सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच १५ आणि १६ मार्चला हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे आज मुंबईसह अनेक राज्यातील बँका बंद आहेत. त्यामुळे या संपाचा सामान्य माणासाच्या जीवनावर परिणाम होतो आहे.
या संपाचा बँकिंग सुविधांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. संपामुळे चेक क्लीअरन्स किंवा लोन मंजुरी सारख्या सुविधांना अडचण येऊ शकते. सोमवारी मंगळवारी बँका बंद असल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय होणार आहे. या संपात महाराष्ट्रातील तब्बल दहा हजाराहून जास्त शाखेतील कर्मचारी सहभागी होणार आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले,की या संपात राज्यातील दहा हजार पेक्षा जास्त शाखेतून काम करणारे अंदाजे पन्नास हजार बँक कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी होत आहेत. संपाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून होईल. उद्या (१६ मार्च) रात्री बारापर्यंत हे कामकाज बंद राहील. या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी होईल.
या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनस कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी होत आहेत.
Maharashtra: The United Forum of Bank Union (UFBU), has called a two-day nationwide strike today and tomorrow, against the privatisation of Public Sector Banks and 'retrograde banking reforms'. Visuals from Mumbai. pic.twitter.com/lmLGJaXNfv
— ANI (@ANI) March 15, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.