HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

अमिताभजींना कोरोना,राजभवनात कोरोना ..आता तरी परिक्षांबाबत निर्णय घ्या !

मुंबई | कोरोनाकाळामध्येसुद्धा UGC ने पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्य परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रासोबतचं अनेक राज्यांनी ही परिक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सांगत परिक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने या आधीच परिक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती मात्र UGC आणि केंद्र सरकारच्या परिक्षा घेण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थीसुद्धा संभ्रमात आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुरूवातीपासुनच परिक्षा न घेण्याची ठाम भूमिका घेतली आहे. परिक्षा घेणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती धोक्याचं आहे हे सांगताना ते म्हणतात, “राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???”

 

Related posts

शिवसेनेने पाठींबा दाखवण्यास असमर्थता दाखवली – पंकजा मुंडे

News Desk

विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे मोबाईल लंपास

अपर्णा गोतपागर

अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होईल!

rasika shinde