HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

राज्यात सध्या सुरु असलेले हे राजकारण हा करमणुकीचा भाग !

मुंबई | ठाकरे सरकार गेले अनेक दिवस विविध प्रकारणांमुळे चांगलेच कोंडीत सापडले आहे. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटके प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, सचिन वाझे, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे धक्कादायक खुलासे, अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा आणि अनेक अन्य प्रकरणांमुळे ठाकरे सरकारची पुरती कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता काही कळायचं बंद झालंय. राज्यात सध्या सुरु असलेले हे राजकारण हा करमणुकीचा भाग आहे”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, “शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण हा करमणुकीचा भाग आहे. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. तेव्हा कळेल राज्याचे राजकारण नेमके कुठे चालले आहे.”

मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी !

उदयनराजे पुढे यावेळी बोलताना म्हणाले कि, “गो कोरोना गो कोरोना असे म्हणून कोरोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निर्बंधांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र, आरोग्य महत्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा”, असे आवाहन देखील उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला केले आहे.

Related posts

शिवसेना म्हणजे कन्फ्यूज पक्ष, शिवसेनेने आधी भूमिका ठरवावी- फडणवीसांचा खोचक सल्ला

News Desk

#Coronavirus : मुंबईनंतर आता पुण्यात रॅपिड टेस्ट किट्सचा वापर

News Desk

आमची ५ वर्षे विरोधकांची रखडलेली काम करण्यातच गेली !

News Desk