HW News Marathi
महाराष्ट्र

ठरलं! उदयनराजे आणि संभाजीराजे आज पुण्यात भेटणार

पुणे | राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षीत असलेल्या संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पुण्यात आज (१४ जून) दुपारी १ वाजता संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी बऱ्याच उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आज अचानकपणे संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या भेटीची माहिती समोर आली आहे.

सध्या संभाजीराजे छत्रपती राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा आहेत. त्यांनी १६ जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उदयनराजे भोसले हे संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार का, हेदेखील पाहावे लागणार आहे.

विशेष म्हणजे, आज सकाळी कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहे. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

संभाजीराजे भेटीवर उदयनराजे काय म्हणाले होते?

संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. थेट दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत हा विषय गेला आहे. अशात खासदार संभाजीराजे आणि खासादर उदयनराजे एकमेकांची भेट आज घेणार अशी चर्चा सुरु होती. या भेटीबाबत अखेर उदयनराजे यांनी खुलासा केला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आमच्या भेटीबाबत कोणीही चुकीचा अर्थ काढू नये. ते आमचे बंधू आहेत हे त्यांचं घर आहे. ते कधीही येऊन भेटू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत आमची भेट होईल असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. या भेटीत त्यांना जे विषय मांडायचे आहेत त्यावर बोलू, असंही ते म्हणाले आहेत.दरम्यान, संभाजीराजेंनी सध्या आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी करा’, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

News Desk

‘या’मुळे उद्धव ठाकरे धर्मवीर सिनेमाचा शेवटचा प्रसंग न पाहाता सिनेमागृहातून निघून गेले

Aprna

लॉकडाऊनविरोधात वांद्रयात मोठा जमाव, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

News Desk