HW News Marathi
महाराष्ट्र

राजभवनावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांची टळली भेट!

मुंबई। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्यात यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्‍यासाठी पोहोचले सत्तेत आल्यापासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं चित्र वारंवार पाहायला मिळते त्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या पत्रावरूनही संघर्ष झालेला आपण पाहिलाय त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांची भेट घेऊन हा तणाव काहीसा निवडण्याचा प्रयत्न केलाय, असं मत राजकीय विश्लेषक मांडतायेत.

१२ आमदारांच्या यादीवर चर्चा

दरम्यान, या भेटीदरम्यान राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या बारा नावांच्या यादी वर चर्चा झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचण्यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर सर्वात आधी पोहोचले होते. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील संबंध तणावपूर्ण असताना मिलिंद नार्वेकर आणि राज्यपाल यांची आधी भेट होणे याला विशेष महत्त्व असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मिलिंद नार्वेकर हे(९:३०) च्या आसपास राजभवनावर गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीची वेळ निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

यानंतर मुख्यमंत्री (१२:३०) सुमारास राजभवनावर वर पोहोचले आणि त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान त्यांच्या काही वेळ आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजभवनावर जाऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांना खास शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना संजय राऊतांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या यादी बद्दलही आठवण करुन दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व धार्मिक स्थळे ८ सप्टेंबरपर्यंत सुरु करा अन्यथा आंदोलन करु, रामदास आठवलेंचा इशारा 

News Desk

पवार-ठाकरेंच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk

“राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा की काही विशिष्ट भागाचा म्हणायचा?” फडणवीसांचा सरकारला सवाल  

News Desk