HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या एकजुटीला तुम्ही चमत्कार म्हणत असाल तर जरूर म्हणा – मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राला मुलाखत दिली. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीत मुख्यमंत्र्यानी सरकार आज पाडू उद्या पाडू असे बोलतात त्यांचे दात का काळे पडले आहेत, असे म्हणत जोरदार फटकेबाजी केली आहे.

“‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो, तुम्हालाही कुटुंब, मुलंबाळं आहेत हे विसरू नका; पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे.”

“मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरू झाले आहेत. ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नक्कीच नाही. एक संस्कृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो,” असा रोखठोक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.

सरकार १ वर्ष पूर्ण करत आहे, हे सरकार ११ दिवसह चालणार नाही, हे सरकार ३ महिन्यांत पडेल अशी टिका केली. हे सरकार आता आपल्याच ओझ्याने खाली पडेल अशी भाकीत वर्तवण्यात आले.

उत्तर – असे बोलणाऱ्यांचे दात पडत आले. सर्वात आधी सामनाच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही आमच्या एकजुटीला चमत्कार म्हणत असाल तर जरूर म्हणा. हे एकजुटीमुळे सगळं शक्य झालं.

प्रेम, आशीर्वाद याशिवाय हे सगळं अशक्य होतं. आघाडी करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत होते तेव्हाच काही जणांना ते आवडत नव्हतं. काही जणांना वाटतं होतं की शिवसेना आपल्या मागे येइल. शिवसेना काही करू शकत नाही. पण त्यांचा तो समज आपण फोल ठरवला.

महापालिकेवरचा भगवा उतरणं केवळ अशक्य!

मुंबईकरांच्या विश्वासाची भक्कम तटबंदी महापालिकेच्या गडाभोवती आहे. म्हणून ज्यांना लढाई करण्याची खुमखुमी असेल त्यांनी या तटबंदीवर डोकं आपटून बघावं. कारण माझ्या मुंबईकरांच्या प्रेमाची आणि विश्वासाची भक्कम तटबंदी या मुंबईच्या आणि महापालिकेच्या भोवती आहे. तिच्यावर भगवा मुंबईकरांनी फडकवल आहे तो कुणाला जवळपास येऊ देणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी आता ऑनलाइन घेता येणार

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

News Desk

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्याच मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक मृतदेह सापडला

News Desk