HW News Marathi
Covid-19

कोरोना लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ मार्च) मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये केरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. करोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी करोनाची लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी लस घेतली आहे. स्वत: लसीकरण करुन घेतल्यानंतर उद्धव यांनी राज्यातील जनतेलाही आवाहन केलं आहे.

आज उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांसोबत जे. जे. मध्ये जाऊन लस घेतली त्यावेळी डॉ. तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. उद्धव यांच्यासोबतच त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हणजेच मिलिंद नार्वेकर आणि रश्मी ठाकरेंच्या आई मीनाताई पाटणकर यांनीही करोना लसीचा पहिला डोस घेतला. या लसीकरणानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘लसीबद्दल मनामध्ये भिती आणि संभ्रम ठेऊ नका. मनात कोणतीही शंका न ठेवता लस टोचून घ्या,’ असं आवाहन उद्धव यांनी केलं आहे. “कोरोनाची लस इतक्या छान पद्धतीने दिली जातेय की लस घेताना कळतही नाही. मी सर्व माता-भगिणींना आणि जे करोनाची लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी मनात कोणताही किंतू परंतू न ठेवता लस घ्यावी असं आवाहन मी राज्यातील सर्व जनतेला करत आहे,” असं उद्धव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लाझ्मा थेरेपीबाबत जनतेने सावध राहावे !

News Desk

सांगलीतील लॉकडाऊन आणखी ३ दिवस वाढला !

News Desk

राज्यात ११,८१३ नवे रुग्ण तर मुंबईत ७९ टक्के रिकव्हरी रेट

News Desk