HW News Marathi
Covid-19

अजित पवारांच्या कामावर लक्ष ठेवायलाच उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर !

मुंबई | “मुख्यमंत्री घरी बसले तर जनक्षोभ निर्माण होईल हे शरद पवारांना ठाऊक होतं. म्हणूनच कॅप्टनने घरी राहून काम करावं, असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला”, अशी बोचरी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, “अजित पवारांच्या कामावर लक्ष द्यायलाच उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहे”, अशीही टीका दरेकरांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (३० जुलै) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील विधानभवन सभागृहात कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक सुरू आहे. पुण्यात दिवसेंदिवस गंभीर होत चालेल्या कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (३० जुलै) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सुरु असताना दुसरीकडे भाजपकडून मात्र वारंवार मुख्यमांवर टीका होताना पाहायला मिळाली आहे.

“राज्याच्या कॅबिनेटच्या बैठका मुख्यमंत्र्यांच्या लहरीप्रमाणे होतात. कॅबिनेट बैठकीबाबत सरकार गंभीर नाही”, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपकडून वारंवार झाली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी “मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील कोरोनास्थितीकडे देखील लक्ष द्यावे”, असा सल्ला देखील दिला होता. “मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे”,अशी टीका पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusve | वाईन शॉपच्या राज ठाकरेंच्या मागणीवर मनसे नेते काय म्हणाले?

swarit

‘महाराष्ट्र बचाव’ भाजपच्या आंदोलनाला ट्वीटवर ‘महाराष्ट्रद्रोही BJP’ ट्रेडिंगने प्रतिउत्तर

News Desk

जगात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ७० लाखांच्या पुढे

News Desk