HW News Marathi
Covid-19

ठरलं ! उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याचा दौरा करणार

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. पुण्यात देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामूळे पुणे प्रशासन आणि महापौर तसेच, पालकमंत्री देखील अनेक उपाययोजना राबवत आहेत. अशातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात काय स्थिती आहे याचा आढावा घेतला नव्हता असा विरोधकांकडून आरोप केला जात होता. त्यामूळे आधी मुख्यमंत्री पुण्याचा उद्या (३० जुलै) दौरा करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता ही शक्यता खरी झाली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाली पुणे जिल्हाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ७५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. इतकेच नाही तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पुण्यामध्ये अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करणार आहे. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. तसेच, कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ११०० नवे रुग्ण आढळले , तर ५३ जणांचा झाला मृत्यू 

News Desk

राज्यातील सिनेमागृह ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार

News Desk

“…तेव्हा कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली ?” पडळकरांनी भाई जगतापांना डिवचले

News Desk