HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊनवर उदयनराजे भडकले ! दिल्ली चालू मग सातारा का बंद?

सातारा | राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतल्यानतंर खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यात दाखल झाले आहेत. सध्या कोरोना परिस्थितीमध्ये अनेक जिल्हे लाॅकडाऊन करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सातारा जिल्ह्याचा देखील समावेश आहे.मात्र लाॅकडाऊन लावणे आपल्याला पटलेलं नाहीये असे सांगत उदयनराजेंनी लाॅकडाऊनबाबत जाहीर नाराजी व्यक्त केलीये त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आलेत.

इंग्रजीत खासदारकीची शपथ घेऊन उदयनराजेंकडून “जय भवानी जय शिवाजी”ची घोषणा

शिवरायांचा अपमान झाला असता तर तिथल्या तिथेच राजीनामा दिला असता !

उदयनराजे भोसले यांनी दिल्लीहून आल्यानंतर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली आणि काही मुद्दयांवर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नव्हे. सर्वच ठिकाणी एकदम शिथीलता देणे योग्य राहणार नाही. टप्प्याटप्प्याने शिथीलता देणे गरजेचे आहे. तसेच 10 ते 2 या वेळेत शिथीलता दिली म्हणजे या वेळेत कोरोना नसतो का?” तसेच आपण दिल्लीला जाऊन आलोय तिथे सगळं चालु आहे मग सातारा बंद का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात ९९८३ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

देशात ४५ हजारांच्या खाली आढळले नवे कोरोना रुग्ण!

swarit

वेळीच नियंत्रण मिळवा नाहीतर…, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवरून WHO चा इशारा

News Desk