HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या’ -दिलीप मोहिते-पाटील

पुणे। खेड पंचायत समितीत शिवसेनेचं बहुमत असतानाही पंचायउत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या आमदारांना समजून घ्या, असा टोला दिलीप मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाल्याने वादाची ठिणगी

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचं बहुमत असतानाही खेड पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाल्याने वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी पडद्यामागून सूत्रे हलविल्यानेच राष्ट्रवादीला खेड पंचायतीवर वर्चस्व निर्माण करता आलं असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व घडामोडींवर मोहिते-पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या, असं सांगतानाच हा स्थानिक पातळीवरचा वाद आहे. त्याचा राज्य सरकारवर काहीच फरक पडणार नाही. आम्ही आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मानत आहोत, असं मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केलं.

या सर्व घटना घडल्यानंतर याला वेगळं वळण देण्याचं काम

खेड तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याच कारण काय ते मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर हे सभापती झाल्यानंतर सहा महिन्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करण्यात येणार होता. तसं पोखरकर यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र सहा महिन्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला. या सर्व घटना घडल्यानंतर याला वेगळं वळण देण्याचं काम माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केलं, असा दावा त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Aprna

पुणे मेट्रोची २ स्थानके दिसणार पुणेरी पगडीच्या आकारात

News Desk

नवीन पुनर्वसन धोरण लवकरच आणणार! – विजय वडेट्टीवार

Aprna