HW News Marathi
महाराष्ट्र

विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

अकोला | विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. विदर्भ एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेने जात असताना अकोल्यातील कुरुम रेल्वे स्थानकात हा तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे दोन तासांपासून विदर्भ एक्स्प्रेस कुरुम स्थानकात थांबली आहे.

विदर्भ एक्स्प्रेसच्या बिघाडामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. विदर्भ एक्स्प्रेसच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी, रेल्वे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी तारांबळ उडाली. घटनास्थळी रेल्वे प्रशासन दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. विदर्भ एक्स्प्रेसमधील बिघाड दुरुस्त करुन या मार्गावरील वाहतूक लवकरच पूर्व पदावर येईल, अशी शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आनंदी झाला म्हणून भाजपास एरंडेल घेऊन कळवळण्याचा अधिकार नाही !

News Desk

‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

News Desk

दाढी करण्यासाठी तीन लाखाचा वस्तारा, व्यवसाय वाढविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

News Desk