अहमदनगर। शिवसेनेचे जेष्ठ नेते असलेले संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाह सोहळा पार पडतोय. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने काल (28नोव्हेंबर) संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता.आणि यावेळी अनेक दिग्गज राजकारण्यांनी या संगीतात हजेरी लावली होती. आणि यात महत्वाची हजरे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची हजेरी महत्वाची मानली जात आहे. कारण वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केलेला डान्स आता प्रचंड व्हायरल होतो आहे. आणि हा डान्स आता लक्ष वेधून घेत आहेत. आणि आता याच भन्नाट डान्सवर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’, अशी विखारी टीका आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलीये.
जनाची नाही तर मनाची तरी ठेवा
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अश्यातच अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? अशी टीका आता विखे पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
https://www.facebook.com/401858593580943/posts/1344795909287202/
लग्नपत्रिका सोशल मीडियावर वेगानं व्हायरल
ऐरवी विरोधकांना थेट अंगावर घेणाऱ्या राऊत यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेमधून देखील राजकीय टोला लगावण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार याच्यासोबत विवाह होणार आहे. याची जय्यत तयार राऊत कुटुंबीयांकडून केली जात आहे. त्यांचा हा विवाहसोहळा आज 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.राऊत यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची एक खास लग्नपत्रिका तयार केली आहे. संबंधित लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर PMkishaadi हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. सध्या ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर, संजय राऊत यांच्या मुलीचं नाव पूर्वशी आणि होणाऱ्या जावयाचं नाव मल्हार आहे. संबंधित लग्नपत्रिकेवर पूर्वशी आणि मल्हार यांची नावं इंग्रजीतून टाकली आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.